बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी
| अलिबाग | प्रतिनिधी |
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये पीएनपी एज्युकेशन सोसायटीचा आर्ट्स, कॉमर्स व सायन्स बारावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. संस्थेमधून श्रावणी राजेश खेडेकर 91.17 टक्के गुण मिळवून प्रथम, आसावरी नरेश गावंड 82.33 टक्के गुण मिळवून द्वितीय तर चैत्राली सुनील मराठे 81.50 टक्के गुण मिळवून तृतीय आलेली आहे.
आर्ट्समध्ये आसावरी नरेश गावंड 82.33 टक्के गुण मिळवून प्रथम, विपुल सुभाष माळी 67.67 टक्के गुण मिळवून द्वितीय तर श्रुती उदय घरत 67.50 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. कॉमर्समध्ये श्रावणी राजेश खेडेकर 91.17 टक्के गुण मिळवून कॉलेज मध्ये आणि संस्थेत प्रथम, चैत्राली सुनील मराठे 81.50 टक्के गुण मिळवून द्वीतीय तर नंदिनी मुकुंद पटेल 79.33 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली. तर सायन्स मध्ये पायल रामचंद्र जानकर 74.17 टक्के गुण मिळवून प्रथम, आर्यन विनोद बनप 72.83 टक्के गुण मिळवून द्वितीय आणि मनस्वी भूषण शिंदे 68.50 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष आ.जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील, प्राचार्य रविंद्र पाटील, पीएनपी कॉलेजचे संचालक प्रा. विक्रांत वार्डे इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले.