| भाकरवड | वार्ताहर |
पिटकीरी येथे शनिवार (दि.20) रोजी रात्री 9:30 वाजता श्री हनुमान नाटय मंडळ पिटकीरी, व ग्रामस्थ मंडळ पिटकीरी यांच्या विद्यमाने 75 वा अमृत महोत्सव वर्ष निमित्ताने नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात अमृत पाटील, का.ही. पाटील, विजय पाटील, सुनिल पाटील, प्रभाकर कोठेकर, आदींच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विविध सामाजिक, आध्यात्मिक, क्रीडा संस्कृतीक क्षेत्रातील जीविता पाटील, अमोल खरसंबले, प्रभाकर कोठेकर, अधिकांत पाटील, जीवन पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी, सुनिल नारायण पाटील लिखित दोन अंकी नाट्य प्रयोग अखेरची जखम सादर करण्यात आला. या नाटकाचे निर्माता विजय पाटील, दिग्दर्शक प्रकाश खरसंबले , सूत्रसंचालन रमाकांत जुईकर, संगीत दिग्दर्शक अमोल खरसंबले, तालरक्षक अधिकांत पाटील, यांनी केले.
या नाटकामध्ये निश्चय जुईकर, प्रतीक जुईकर, सुनिल पाटील, परेश पाटील, भालचंद्र पाटील, सुभाष म्हात्रे, सूरज कोठेकर, गौरव पाटील, रोहिणी झेंडे, पंकज कोठेकर व विजय पाटील, या सर्व कलावंतांनी उत्कृष्ट अभिनय केलाया प्रयोगासाठी बळीराम खरसम्बले, जनार्दन जुईकर, सुधीर पाटील, अनिल पाटील, विद्याधर पाटील, का.ही. पाटील, कैलास पाटील, राजन कोठेकर, अंकुश पाटील, विनोद पाटील, रविंद्र पाटील, नंदू म्हात्रे, अशोक पाटील, व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ पिटकीरी, व रामेश्वर क्रिकेट क्लब पिटकीरी, महिला वर्ग आदींनी परिश्रम घेतले.