श्री समर्थ कृपा विद्यालयात महिला दिन साजरा

। चिपळूण । वार्ताहर ।
खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्‍व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज वेरळ येथे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला निशा जाधव पोलीस निरीक्षक खेड, सुप्रिया पाष्टे, अनुराधा धारप, संपदा गुजरार्थी, नईमा राजपुरकर, सविता कलिंगणे, आकांक्षा साळुंखे, सुप्रिया पाष्टे, स्वाती कान्हेकर, पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर इ. 7 वी व 8 वी तील विद्यार्थ्यांनी स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर पथनाट्य सादर केले. इ. 7 वी व 8 वी तील विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षण करण्यासाठी काही प्रात्यक्षिके सादर केली. या कार्यक्रमास प्रशालेतील महिला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जरीन बटे तर आभार प्रदर्शन श्रेया चाळके यांनी केले.

Exit mobile version