सभापतीपदी समाधान पाटील, उपसभापती माणिक वाघमारे
| कोळा | वार्ताहर |
सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीपदी शेतकरी कामगार पक्षाने आपल्याकडेच ठेवत वर्चस्व कायम ठेवले आहे. सभापतीपदी समाधान पाटील व उपसभापती माणिक वाघमारे यांना संधी दिली. दोघांचीही निवड बिनविरोध झाली आहे.
यावेळी शेतकरी कामगार पक्षाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हालचाली केल्या होत्या. परंतु या निवडणुकीमध्ये परंतु या निवडणुकीत परिवर्तन आघाडीला यश मिळाले नव्हते. सत्ताधारी शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकरी विकास आघाडीने सर्वच 18 जागा जिंकल्या होत्या. बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेकापने सर्व पक्षाला सामावून घेऊन निवडणुकी केली असली तरी सभापती व उपसभापती पद हे स्वतःकडेच ठेवले आहे. या सभापती, उपसभापती निवडीसाठी मोठी रस्सीखेच सुरू होती. सभापती कोणाच्या गळ्यात माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.शेवटी सभापतीपदी समाधान पाटील यांची तर उपसभापतीपदी माणिक वाघमारे यांची वर्णी लागली आहे.
सभापती, उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज दाखल झाल्याने दोन्ही पदाच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत. ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण जागेतून समाधान पाटील तर ग्रामपंचायतच्याच अनुसूचित जाती जमातीच्या प्रवर्गातून माणिक वाघमारे हे निवडून आले होते.शेकापचेच सभापती व उपसभापती निवडीनंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. निवडीनंतर नूतन सभापती व उपसभापती यांचा सत्कार शेकापचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत देशमुख, पोपट टे, पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. सभापती उपसभापती निवड झाल्यानंतर सूतगिरणीवर स्व. गणपतराव देशमुख यांच्या समाधीस्थळावर सर्व संचालकांनी अभिवादन करून दर्शन घेतले.
कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापचे वर्चस्व अबाधित असून गणपतराव देशमुख यांच्या विचारानुसार बळीराजा शेतकरी वर्गाला व सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून नूतन सभापती, उपसभापती व सर्व संचालक मंडळ यांनी पारदर्शक कारभार करावा
डॉ. बाबासाहेब देशमुख, प्रदेशाध्यक्ष, पुरोगामी युवक संघटना