सभापतीपदी प्रकाश फराट तर उपसभापतीपदी कृष्णा बदे
| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापती पदावर शेतकरी कामगार पक्षाचे संचालक यांची निवड झाली आहे. कर्जत बाजार समितीवर शेकाप राष्ट्रवादी काँग्रेस यांचे बहुमत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची सर्वसाधारण निवडणूक 14 मे रोजी झाली होती. बाजार समितीच्या 18 संचालक यांच्यापैकी 10 संचालक हे बिनविरोध निवडून आले होते. तर आठ जागांसाठी मतदान घेण्यात आले होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी 22 मे रोजी सहकार निबंधक बालाजी कटकधोंड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या निवडणुकीसाठी सभापती पदासाठी साळोख ग्रामपंचायतमधील प्रकाश फराट यांनी तर उपसभापती पदासाठी कळंब ग्रामपंचायतमधील कृष्णा बदे यांनी नामांकन अर्ज दाखल केला होता. निर्धारित मुदतीत सभापती पदसाठी प्रकाश फराट आणि उपसभापती पदासाठी कृष्णा बदे यांचे एकमेव अर्ज शिल्लक राहिले होते. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कटकधोड यांनी सभापतीपदी फराट यांची तर उपसभापती बदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
या विशेष बैठकीस संचालक गजानन पेमारे, यशवंत जाधव, शरद लाड, विष्णु कालेकर, संतोष वैखरे, अजित पाटील, हर्षद भोपतराव, रमाकांत जाधव, आदित्य गायकवाड, प्रवीण ओसवाल, दिनेश जैन, सुप्रिया थोरवे, केतन झांजे, अर्चना थोरवे आदी सर्व सदस्य उपस्थित होते.
नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचे अभिनंदन करण्यासाठी ज्येष्ठ नेते विलास थोरवे, शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे, माजी सभापती डामसे, जिल्हा बँक संचालक राजेंद्र हजारे, नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी सभापती राजेंद्र विरले, तानाजी मते, शेकाप पुरोगामी युवा अध्यक्ष महेश म्हसे, दत्ता राणे, अशोक भुसाल, पांडुरंग बदे, बाळू थोरवे, सीताराम मांडावले, डी.के.भोईर, बबन भालेराव, बबन गांधिवले, हनुमान बडे, प्रमोद कोंडीलकर, गणेश म्हसे, प्रकाश म्हसे, जगदीश म्हसे, सुनील बदे, लक्ष्मण राणे, सोमनाथ फराट, रवींद्र फराट, मसूद बुबरे, सोहेब पालटे, सकलेन बुबेरे आदी उपस्थित होते.