| माणगाव | वार्ताहर |
माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोक दादा साबळे विद्यालय व माणगाव ज्युनिअर कॉलेज माणगाव या उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखीत नेत्रदीपक यश संपादन केले. या बारावी परीक्षेमध्ये कॉलेजच्या विज्ञान शाखेचा एकूण 99.56 टक्के, वाणिज्य शाखेचा 99.41टक्के, तर कला शाखेचा 98.83टक्के इतका लागला. विज्ञान शाखेत तन्वी कदम 87.83 टक्के, धनश्री पालकर 84 टक्के, साहिल आडीत 83 .50 टक्के, झरीन बंदरकर 80.83 टक्के, हेतल दोशी 80.33 टक्के गुण मिळविले.
वाणिज्य शाखेचा एकूण निकाल 99.41 टक्के इतका लागला त्यात सलोनी भोसले 85.67 टक्के, सुहानी साखरे 75. 67 टक्के, सुजित धोत्रे 73 टक्के, ऋतुजा सुतार 71.05 टक्के, सेजल प्रजापती व तन्वी तळकर यांना 70.6 7 टक्के इतके गुण मिळाले. कला शाखेचा एकूण निकाल 98. 28 टक्के इतका लागला असून सवानी डवले 69.33 टक्के, श्रावणी पोटले 66.33 टक्के, सुभद्रा कदम व रोशन ढाकवल याना 63.33 टक्के, निशा महाडिक 62.67 टक्के, उषा शिंदे 62.33 टक्के गुण मिळाले. या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अँड. राजीव अशोक साबळे तसेच सेक्रेटरी, स्कूल कमिटी चेअरमन, सर्व सदस्य, प्राचार्य, सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.