| रसायनी | वार्ताहर |
ग्रामसेवक ते ग्रामविकास अधिकारी म्हणुन आपल्या ग्रामपंचायत मधील कारभार पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आणणारे मोहन शेलार यांच्यासारखा अधिकारी असल्याने गावचा विकास होण्यास वेळ लागत नाही, त्यांचा आदर्श घेणे महत्वाचे आहे, असे गौरवोद्गार सहाय्यक गटविकास अधिकारी महादेव शिंदे यांनी काढले.
मोहन गोपाळ शेलार यांनी आपल्या प्रशासकीय सेवेत 31 वर्ष सेवा पूर्ण करून स्वेच्छा निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे त्यांचा निरोप समारंभ ग्रामसेवक संघटना यांनी आयोजित केला होता, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे बोलत होते.
कार्यक्रमास पेण पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे, संतोष गुरव, विस्तार अधिकारी शैलेंद्र तांडेल, जिल्हा कार्याध्यक्ष संतोष पवार, कोकण विभागीय सहसचिव प्रमोद, पाटील, तालुका अध्यक्ष प्रशांत कदम, सचिव अजय फोफेरकर, सौ.शेलार, कुटुंबीय त्यांचा मित्र परिवार, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.