रत्नागिरी | प्रतिनिधी |
सरकारने संपकरी एसटी कर्मचार्यांवर कारवाईचा इशारा दिल्याने त्या कारवाईच्या भीतीमुळे निलंबित, सेवासमाप्तीमधील काही कर्मचारी हजर झाले असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.
विभागात 625 कर्मचारी कामावर हजर होते. यामध्ये प्रशासकीय 260, कार्यशाळा 195, चालक 74, वाहक 63, चालक तथा वाहक 33 कर्मचार्यांचा समावेश होता. तसेच 102 कर्मचारी अधिकृत रजेवर होते. अजूनही 3052 कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत.
कारवाईच्या भीतीने सेवासमाप्ती, निलंबित, बदली कर्मचारी हजर झाल्याची माहिती प्रशासनाने दिली. रत्नागिरी विभागात दुपारच्या सत्रामध्ये कर्मचारी हजर झाले. यामध्ये प्रशासकीय 3, कार्यशाळा 4, चालक 14, वाहक 4 असे एकूण 25 जण हजर झाले.
4 लाख 12 हजारांचे उत्पन्न
रत्नागिरी जिल्ह्यात काल (ता.21) दापोली 4032, खेड 1835, चिपळूण 2660, गुहागर 72, देवरुख 4648, रत्नागिरी 22, लांजा 788, राजापूर 2439 आणि मंडणगडमध्ये 177 अशा 16703 प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे एसटी विभागाला 4 लाख 12 हजार 477 रुपयांचे उत्पन्न मिळाले.