| आंबेत | प्रतिनिधी |
आंबेत-म्हाप्रळ सावित्री खाडीवरील आंबेत पूल गेली कित्येक वर्षे बंद अवस्थेत आहे. पूल बंद झाल्यानंतर या मार्गावरील एसटी सेवा देखील ठप्प पडली होती. जेटीतून प्रवास करण्यास महामंडळाची कोणतीच परवानगी नसताना संपूर्ण एसटी फेऱ्या या महाड मार्गी जात होत्या.
परिणामी, नागरिकांचे होत असलेले हाल आणि उलट प्रवास याचा विचार करत रत्नागिरी परिवहन वाहतूक विभागाने जंगल जेटीतून एसटी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना या मार्गावरुन प्रवास करणे सोयीचे होणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये मंडणगड 13 फेऱ्या दापोली 8 फेऱ्या सुरु करण्यात येणार आहेत.