। पनवेल । वार्ताहर ।
आयडीयल कपल ही संकल्पना काय ते तेजस्वी प्रकाश आणि अभिनय बेर्डेकडे पाहून लक्षात येत आहे. बिनधास्त, चंचल तेजस्वी जेव्हा शांत, संयमी अभिनय बेर्डेच्या प्रेमात पडते तेव्हा व्हायोलिन, गिटारसह सुरांची बरसात होते. अशीच प्रेमाची बरसात आणि गाण्याची जबरदस्त मैफल मन कस्तुरी रेच्या कलाकारांसह पनवेलच्या पिल्लई महाविद्यालयात रंगली होती. निमित्त होते मन कस्तुरी रे चित्रपटातील नाद या रॅाक साँग लाँचचे. यावेळी कलाकारांसह महाविद्यालयाचे विद्यार्थी चित्रपटातील गाण्यावर थिरकले.
यावेळी हे गाणे विद्यार्थ्यांनी स्टेजवर सादर करून अभिनय बेर्डेला अनोखी भेट दिली. गाण्याच्या प्रदर्शनाच्या वेळेला पिल्लई महाविद्यालय रसायनी येथील यूफोरिआचे सुद्धा मोठ्या थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी पिल्लई महाविद्यालयाचे संस्थापक डॉ. के.एम. वासुदेवन, पिल्लई क्रिडा व्यवस्थापन अभ्यासक्रमाचे संचालक प्रणव पिल्लई, डॉ.प्राचार्य लता कस्तुरे मेनन, पिल्लई महाविद्यालयाच्या डायरेक्टर पब्लिक रिलेशन निवेदिता श्रेयांस आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.