जय शहा यांनी केली घोषणा
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी टीम इंडियाच्या नवीन किट प्रायोजकाची घोषणा केली. आयपीएलनंतर भारतीय क्रिकेट संघ वर्ल्ड कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हा सामना 7 ते 11 जूनदरम्यान लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यानंतर आशिया कप आणि एकदिवसीय विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धा होणार आहेत. याआधी जय शहा यांनी मोठी घोषणा केली आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सोमवारी टीम इंडियाच्या नवीन किट प्रायोजकाची घोषणा केली. भारतीय क्रिकेट संघाचा नवीन किट प्रायोजक आदिदास असेल, असे ट्विट त्यांनी केले. यासोबत टीम इंडिया डब्ल्यूटीसी फायनलमध्ये नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल.
जय शहा म्हणाले की, मला कळवताना अतिशय आनंद होत आहे की बीसीसीआयने किट प्रायोजक म्हणून आदिदास कंपनीशी करार केला आहे. क्रिकेटचा खेळ पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्सवेअर कंपनीसोबत करार केल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे.