जम्मू | वृत्तसंस्था |
भारतीय लष्कराने आरएसपुरा भागात एका महिला पाकिस्तानी घुसखोराला ठार केले आहे. यासोबतच परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमेपलीकडून काही लोकांनी भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. या भागात गस्त घालणार्या जवानांना संशयास्पद हालचाल दिसल्यानंतर त्यांनी त्यांना इशारा दिला, मात्र घुसखोरांकडून त्याकडे दुर्लक्ष केले. जेव्हा घुसखोर भारतीय हद्दीत पोहोचले तेव्हा सैनिकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण ते पळू लागले. दरम्यान, गोळी लागल्याने एकाचा मृत्यू झाला. शोध मोहिमेनंतर मृत व्यक्ती एक घुसखोर एक महिला असल्याचे समोर आले. याबाबत पुढील तपास केला झात आहे.