गोव्याच्या भुमीत महाराष्ट्राचा डंका

राष्ट्रीय स्तरावर पटकावला प्रथम क्रमांक

। रसायनी । वार्ताहर ।

ऑल इंडिया स्पोर्ट्स फेडरेशन व इंग्लिश मीडियम स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पोर्ट्स चॅम्पियनशिप 2024’ चे आयोजन गोवा मडगाव येथील पार्वतीबाई चौगुले महाविद्यालयात करण्यात आले होते.

या स्पोर्ट्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये पाचहुन अधिक राज्यातील निवडक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत महाराष्ट्राच्या एकूण 20 खेळाडूंनी 9- सुवर्णपदक व 11- रौप्य पदक पटकावले आहे. यात सुवर्णपदक विजेते खेळाडू यश मोरे, अविर बनसोडे, स्वरा पिसाळ, वेदांत शेटे, ओम कोठावले, आर्यन साह, स्वराज पाटील, निशा सरदार, असित इंगळे व रौप्यपदक विजेते खेळाडू देवेश नवीन, वृद्धि बिरादार, अक्षया बनसोडे, मीत पाटील, राज शितोळे, हर्षल कुंडलकर, ध्रुव दिघाडे, वेदांत कुडके, श्रेयश मडके, निहार शिंदे, अंश पगार आदींचा समावेश आहे. विजयी खेळाडू हे रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यामधील सीकेटी कॉलेज खांदा कॉलनी, पंचदीप संकुल बालग्राम महाराष्ट्र खांदा कॉलनी व एसएमडीएल महाविद्यालय कळंबोली येथे मार्शल आर्ट प्रशिक्षक भूपेंद्र शिवाजी गायकवाड यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहेत.

तसेच, महाराष्ट्र संघाने या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी पटकावली आहे. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देत महाराष्ट्र राज्य संघ प्रशिक्षक भूपेंद्र गायकवाड, संघ व्यवस्थापक धनेशा शिंगोटे, प्रीतम गायकवाड, आयुष कांबळे व त्यांच्या खेळाडूंनी गोव्याच्या भूमीत महाराष्ट्र राज्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर गाजवले आहे. येणार्‍या काळामध्ये विजयी खेळाडूंमधील निवडक खेळाडू हे नेपाळमध्ये होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जाणार असल्याचे प्रतिपादन इंग्लिश मीडियम स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव डॉ. मलिक व महाराष्ट्र राज्य सचिव आशिष डोईफोडे यांनी केले आहे. यासाठी सर्व खेळाडूंनी नियमित कसून व चांगला सराव करावा, असे सांगत त्यांना विजयी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.

या स्पर्धेदरम्यान इंग्लिश मीडियम स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव डॉ. युसुफ मलिक, इंग्लिश मीडियम स्पोर्ट्स स्टुडंट्स असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष संतोष कसबे, महाराष्ट्र राज्य सचिव आशिष डोईफोडे व महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पाटील आदी उपस्थित होते. विजय खेळाडूंवर संपूर्ण महाराष्ट्रातून व त्यांच्या शाळा महाविद्यालयातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Exit mobile version