| वेनगाव | वर्ताहर |
कर्जत तालुक्यात वेनगाव येथील माळरानावर लागलेल्या वणव्याच्या आगीत बाजूला असलेल्या शेतातील (गंजी) आग लागून आठ ते दहा हजाराचे नुकसान झाले आहे.
वेनगाव येथील शेतकरी बबन अप्पा पालकर व दिनेश मारुती पालकर यांनी आपल्या जवळील असणाऱ्या गुरांना लागणारा पेंडा गावा बाहेर असलेल्या शेत खल्यावर एकगठ्ठा मळणी रचून ठेवल्या होत्या. रविवार शेत खळ्याच्या बाजूला लागून असलेल्या माळ रानावर आगीचा वणवा लागल्याने त्या वणव्याच्या आगीत बाजूच्या आठ ते दहा हजारांच्या पेंड्याच्या दोन मलण्या जळून खाक झाल्या. घटना ठिकाणी वेनगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक केशव जाधव व तलाठी वैभव अंबोलकर येऊन घटना स्थळाची पाहणी करून जळालेल्या पेंड्यांच्य माळणीचा पंचनामा करण्यात आला आहे.