आई एकविरा चषकाचा थरार

| रसायनी | प्रतिनिधी |

वरोसे गावात आई एकविरा चषक 2026 पर्व 2 या वरोसे गावातील आई गावदेवी क्रिकेट संघ वरोसे व रुद्र इंटरप्राईजेस यांच्या विद्यमाने या स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. वरोसे गावातील प्रशस्त मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत परिसरातील अनेक नामांकित संघ सहभागी झाले असून क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. उद्घाटनानंतर झालेल्या विशेष 5 षटकांच्या सामन्यात वरोसे 40+ आणि खालापूर पोलीस संघ यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली. स्पर्धेच्या पहिल्या रात्री अनेक रोमांचक सामने खेळविण्यात आले. त्यामध्ये निगडोली तड जय भवानी जांब्रुक-वांवढळ, राजवीर 11 वरोसे 40+ तड जिविका 11 गावदेवी आसरे, (राम), कालनवाडी तड आई काळंबामाता नढाळ,आई गावदेवी सारंग तड नयन स्मृती जय गावदेव टेंभरी, जय गावदेवी कांधरोली (करण) तड समर्थ यज्ञेश 11 गावदेवी पाली,जय हनुमान इंसाबे तड न्यू स्टार नडोदे पहिली रजनी सामन्यांमध्ये खेळाडूंनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या स्पर्धेसाठी आयोजकांकडून प्रथम क्रमांक 1,00,000 व चषक, द्वितीय क्रमांक 50,000 व चषक, तृतीय क्रमांक 25,000 व चषक, तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक तसेच लकी ड्रॉ यांसाठीही विशेष बक्षिसे ठेवण्यात आले आहे.

Exit mobile version