| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आयपीएल 2023 ची लीग फेरी आता संपली आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यानंतर पात्रता फेरीसाठी संघ निश्चित झाले आहेत. आता जेतेपदासाठी चार संघ एकमेकांशी भिडतील. जेतेपद कोणाच्या नावावर होणार हे ठरलेले नाही, पण हा चॅम्पियन जो असेल, त्याचा संघ मालामाल होणार, हे मात्र नक्की आहे. क्रिकेटमधील सर्व टी-20 लीगमध्ये आयपीएलची बक्षीस रक्कम सर्वाधिक आहे.
आयपीएलचा पहिला हंगाम 2008 मध्ये झाला होता. त्यावर्षी आठ संघांनी विजेतेपदासाठी स्पर्धा केली होती आणि राजस्थान रॉयल्स चॅम्पियन म्हणून उदयास आला. त्या वर्षी राजस्थान रॉयल्सला 4 कोटी 80 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. याशिवाय अंतिम फेरीत राजस्थानकडून पराभूत झालेल्या चेन्नई सुपर किंग्जला उपविजेते म्हणून 2.4 कोटी रुपये देण्यात आले होते.
2008 पासून आयपीएलच्या बक्षीस रकमेत पाच पटीने वाढ झाली आहे. आयपीएल 2023 चे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला 20 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाईल. अंतिम फेरीत पराभूत होणारा संघही रिकाम्या हाताने जाणार नाही. त्याला 13 कोटी रुपयेही दिले जाणार आहेत. त्याच वेळी प्लेऑफमध्ये स्थान मिळवणाऱ्या इतर दोन संघांना 7-7 कोटी रुपये मिळतील. आयपीएलमध्ये केवळ चॅम्पियन बनणाऱ्या संघालाच नाही तर खेळाडूंनाही अनेक पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांसाठी पारितोषिक रक्कमही दिली जाते.
ऑरेंज कॅप – 15 लाख
पर्पल कॅप – 15 लाख
सर्वाधिक षटकार – 12 लाख
सुपर स्ट्रायकर – 15 लाख