कंटेनर मोटारसायकल अपघातात तीन तरुण जागीच ठार

| नाशिक | वृत्तसंस्था |

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुका पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या निमोण गावाजवळ शनिवारी (दि.20) सायंकाळच्या सुमारासकंटेनर व पल्सर मोटारसायकल अपघातात आदिवासी कुटुंबातील तीन तरुण ठार झाले. अपघातात हे तीन तरुण ठार झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बचाव कार्यास मदत केली.

अपघात पोलिस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने अपघाताची माहिती मिळताच पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे हे अपघात स्थळी पोचून कंटेनर ताब्यात घेतला व गुन्ह्याची माहिती घेऊन पंचनामा केला. अपघातामध्ये नांदुर-शिंगोटे येथील वाशी कुटुंबातील कुंडलिक पंढरीनाथ मेंगाळ (३०) व युवराज धोंडीबा मेंगाळ (२९) हे दोघेही राहणार नांदूर शिंगोटे तिघे मोटारसायकलने जात असताना यांचा अपघात इतका जबरदस्त होता की अपघातामध्ये तिघेही तरुण जागीच ठार झाले.

Exit mobile version