| नेरळ | वार्ताहर |
माथेरान या थंड हवेच्या ठिकाणाला शोध 1850 रोजी ब्रिटिश गव्हर्नर ह्यूज मलेट यांच्या कडून लावण्यात आला. (दि.21) रोजी माथेरानचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. 21 मे 1850 रोजी ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेले सर ह्यूज मलेट हे चौक जवळील सोंडेवाडी मधील व्यक्तीला वाट दाखवण्यासाठी सोबत घेवून माथेरानच्या डोंगरावर पोहचले. चौकपासून चालत डोंगर चढून वन ट्री हिल पॉइंट येथे पोहचलेले ह्यूज मलेट हे पहिले अधिकारी ठरले आणि त्यांनी माथेरानचा शोध लावला असे जाहीर झाले. 21 मे 1850 रोजी परतीचा प्रवास त्यांनी रामबाग पॉइंट ते चौक असा केला होता.त्यावेळी या ब्रिटिश अधिकाऱ्याने माथेरानचे नामकरण ब्रिटिश नामावली प्रमाणे केले नाही. तर अगदी मराठमोठे असे माथेरान हे नाव दिले.
माथेरान म्हणजे माथ्यावरील रान, त्यानंतर ठाणे येथे परत गेल्यावर माथ्यावरील रानाच्या आणि तेथील गर्द हिरव्या झाडाच्या बनामुळे प्रेमात पडलेले ह्यूज मलेट यांनी 1851 मध्ये ब्रिटिश शासनकर्ते यांनी रामबाग ते चौक असा रस्ता त्याकाळी 500 रुपये मजुरी खर्चून तयार केला. तर 1851मध्ये रामबाग पॉइंटपासून जवळच असलेल्या ठिकाणी बाईक नावाचा बंगला बांधला. माथेरान मधील तो पहिला बंगला ठरला होता आणि तो पहिला बंगला आज दि बाईक हॉटेल या नावाने ओळखला जात आहे.
1857 मध्ये ठाण्याचे कलेक्टर ह्यूज मेलेट यांनी नेरळ ते माथेरान हा घाटातील रस्ता तयार केला. त्यावेळी माथेरानमध्ये काही धनिक मंडळी आली आणि त्यांनी गुलस्थान बंगला, बार हौस बंगला, टूर पिटीत बंगला असे काही बंगले बांधण्यात आले. त्यामुळे निसर्गरम्य माथेरान हे थंड हवेचे पर्यटन स्थळ निर्माण झाले. त्यानंतर माथेरान गिरीस्थान नगर परिषद, पोस्ट ऑफिस, टेलिग्राम, टेलीफोन एक्सचेंज अशा सुविधा माथेरान येथे निर्माण निर्माण केल्या गेल्या. त्याकाळी मुंबई येथून रामबाग मार्ग, चालत, घोड्यावर किंवा डोलीत बसून माथेरान ला पर्यटक येत असत. पुढे सन 1854 मध्ये मुबंई पुणे या मार्गांवर रेल्वे चालू झाली तेंव्हा नेरळ या रेल्वे ट्रेन थाबत असे तेथे उतरून नेरळ माथेरान या घाटातील रस्त्याने चालत, घोडा, किंवा डोलीत बसून माथेरानला येन्याचा मार्ग 1857 मध्ये विकसित करण्यात आला होता.
सन 1900 च्या दरम्यान मुबंईचे शेरीफ असलेले व्यवसायिक सर आदमजी पिरभाय, मुलगा हुसेन अब्दुल पिरभाय हे माथेरान पहाणासाठी नेरळ येथे आले तेंव्हा त्यांना माथेरान येथे येण्यासाठी डोली उपलब्ध झाली नाही. सर आदमजी पिरभोय त्यांचा इंजिनियर पदवीधर मुलगा अब्दुल हुसेन पिरभाई यांनी नेरळ माथेरान या अत्यंत अवघड घाटातील रेल्वेच्या कामाला सन 1901 मध्ये सुरवात केली आणि 15 एप्रिल 1907 रोजी नेरळ माथेरान या 21 किलोमीटर नेरोगेज मार्गवर पहिली मिनी ट्रेन सुरु केली. या कामाकरिता आदमजी पिरभाई यांनी एकुण 16 लाख रुपये खर्च करून ही मिनी ट्रेन सेवा चालू केली. माथेरानच्या एकंदर जडणघडणीत आणि विकासात नेरळ माथेरान ट्रेनचे जनक पिरभोय त्याचे पुत्र अब्दुल हुसेन आली पिरभोय यांचे योगदान मोठे राहिले आहे. माथेरानमध्ये व्यवसायिक, स्थानिक, राजकारणी आणि नगरपरिषद यांच्या मार्फत वाढदिवस दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम साजरे करून साजरा केला जातो.