अलिबागला अरुण भोर, सोनाली कदम यांची रोह्यात बदली
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगड पोलिस दलात तिन वर्षाचा पोलिस उपअधीक्षक पदाचा कालावधी पुर्ण झालेल्या सहा पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. अलिबागच्या उपविभागीय अधिकारी सोनाली कदम यांची बदली रोहा उपविभागीय अधिकारी म्हणून झाली आहे. तर वरीष्ठ पोलिस निरीक्षक पदावरून अरुण भोर यांची पदोन्नती झाल्याने अलिबाग उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. राज्यातील 166 पोलिस उपअधीक्षकांची, तर 143 वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची पदोन्नतीने बदली झाली. गृह विभागाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांनी सोमवारी रात्री उशिरा बदल्यांचे आदेश जारी केले.
एकाच ठिकाणी तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण केलेल्या उपअधीक्षकांच्या बदल्या झाल्या. यात अलिबागच्या उविभागीय अधिकारी सोनाली कदम यांची रोहा येथे बदली झाली. कोविड काळात सोनाली कदम यांनी महत्वाची भुमीका बजावली होती. तर निसर्ग चक्रीवादळ व तौक्ते वादळात गरजूंच्या मदतीसाठी पुढे आल्या होत्या. नवी मुंबई येथील विशेष महानिरीक्षक यांचे वाचक शिवाजी फडतरे यांची पेण उपविभागीय अधिकारी म्हणून, प्रदीप जाधव यांची महाड उपविभागीय अधिकारी म्हणून, नितीनकुमार पोंदकुले यांची माणगाव उपविभागीय अधिकारी म्हणून तर महाराष्ट्र पोलिस अकादमी नाशिक येथील संजय सावंत याची पोलिस उप अधिक्षक मुख्यालय बदली झाली. पदोन्नतीने झालेल्या बदल्यांमध्ये पोलिस अधीक्षक कार्यालयातील कल्याण शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अरुण भोर यांची अलिबाग उपविभागीय पोलिस अधिकारी पदी बदली झाली. तर तातडीने बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.