| खारेपाट | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील शिरवली- माणकुले रस्त्यावरील मानकुले हायस्कुल नजीक पुल धोकादायक बनला आहे. पुलाला मोठे भगदाड पडले आहे. सदर पुलाखालून समुद्रातील उधाणाचे खाऱ्या पाणी जात असल्याने तो पूल खचला आहे. उधाणाचे खारे पाणी तसेच पावसाळ्यात गोड्या आणि खार्या पाण्याचा मारा यामुळे या पुलाला धोका निर्माण झाला आहे. जर हा पूल कोसळला तर बहिरीचा पाडा, माणकुळे, नारंगीटेप, बंगला बंदर परिसरातील गावांतील सुमारे 3 हजार लोकसंख्येचा येण्या जाण्याचा मार्ग ठप्प होणार आहे.
अनेक वर्षे सदर पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. बांधकाम विभाग अधिकारी वर्गाने सदर पुलाची दखल घेऊन सदर पुल नव्याने व्हावा यासाठी ग्रामस्थांकडून जोरदार मागणी केली जात आहे. अनेक वेळा विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनेही सादर केला मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आतापर्यंत दखल घेतली नाही.
पुलाच्या दयनीय अवस्थामुळे अलिबाग माणकुळे एसटीही बंद झालेली आहे. परिणामी शाळा कॉलेजातील विध्यार्थी, रोजीरोटी साठी महिला वर्ग अलिबाग व अन्य ठिकाणी एसटीने प्रवास करतात परंतु एस टी गावात येत नसल्याने महिला वर्गाचे हाल झाले आहेत. तसेच आजारी रुग्णांना दवाखान्यात ये जा करण्यासाठी त्यांचे हाल होत आहेत. तसेच त्या अनुषंगाने सदर पुलासंदर्भात लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घ्यावी,अशी मागणी जोर धरत आहे.