पार्किंगमधून दुचाकी चोरी

| पनवेल | प्रतिनिधी |

कामानिमित्ताने जाताना खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या पार्किंग मध्ये उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. आदई वसाहतीमधील रहिवासी अभिषेक यांनी मुंबई येथे कामानिमित्ताने जाताना स्वतःच्या मालकीची टीव्हीएस एन्टर्क मोपेड दुचाकी खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या पार्किंगमध्ये उभा केली होती. मात्र, कामावरून आल्यानंतर ते पार्किंगमध्ये आले असता त्यांची दुचाकी पार्किंगमध्ये त्यांना दिसून आली नाही. त्यांनी शोध घेतला, मात्र दुचाकी मिळून आली नाही. त्यामुळे त्यांनी कामोठे पोलीस ठाण्यात वाहन चोरीची तक्रारदेखील नोंदवली. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर चोरटा खुद्द पार्किंगचे पैसे भरून गाडी घेऊन जाताना दिसत आहे.

Exit mobile version