| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील पळस्पे हायवे ट्रॅफिक चौकीजवळ शुक्रवारी पहाटे उभ्या ट्रक चालकाला चार अज्ञात इसमांनी मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. उदयविर बरनामसिंग श्रीवास्तव (36) व त्याचा सहकारी हे त्यांच्या ताब्यातील वाहन क्र.एचआर-38-एबी-6224 हे वाहन थांबवून टायरमधील हवा तपासत असताना अचानक चार अनोळखी इसम त्या ठिकाणी आले व त्यांनी या दोघांना हाताबुक्क्यांनी तसेच एका इसमाने त्याच्या सहकार्यास लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून जखमी केले. दरम्यान, त्यांच्याकडील रोख रक्कम तसेच मोबाईल फोन असा ऐवज लंपास केला.
अज्ञातांनी ट्रक चालकाला लुटले
