मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय
विभागीय व्यवस्थापकांचा दौरा
नेरळ | प्रतिनिधी |
युनोस्को मुळे माथेरानचे पर्यावरण जगाला कळणार असून मिनिट्रेनच्या माध्यमातून ते दाखवणार असल्याचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी सांगितले. नेरळ-माथेरान-नेरळ मिनिट्रेनला युनोस्को मध्ये स्थान मिळाल्यानंतर मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल हे माथेरान रेल्वे स्टेशन सुशोभित करणे,पर्यटकांना रेल्वेच्या सोयी-सुविधांची पाहणी तसेच माथेरान मधील पुढील कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी माथेरान भेटीला आले होते.
माथेरानच्या पर्यटनाला चालना देणारी आणि आबालवृद्धांची आवडती महाराष्ट्रातील एकमेव नेरोगेज माथेरानची राणी म्हणजेच मिनिट्रेन ही पुन्हा युनेस्कोच्या हैरिटेज साठी सज्ज झाली आहे. युनोस्कोचा पहिल्या फेरीमध्ये यश संपादन केले असून दुसर्या फेरी कडे योग्य वाटचाल सुरू आहे.आपल्या माथेरानची राणीही युनोस्कोच्या हेरिटेज साठी देशाचे प्रतिनिधित्व करीत आहे.यापूर्वी देखील 2002 सालीच्या दरम्यान युनेस्को कडून माथेरान मिनिट्रेनला हैरिटेज दर्जा देण्यासाठीचा प्रेयत्न अयशस्वी झाला होता.परंतु आत्ता माथेरान मिनिट्रेन ही युनोस्कोचा हेरिटेज दर्जाचे स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.माथेरानच्या राणीलाहेरिटेज दर्जा प्राप्त झाल्यास माथेरानच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे.
यासाठीच मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल हे माथेरान नगरीच्या अमनलॉज स्थानकात दाखल झाल्यानंतर संपूर्ण स्थानकाची पाहणी केली.तसेच अधिकार्यांना आवश्यक सूचनाही केल्या.दरम्यान रेल्वेची अनेक कामे सुरू असून नवीन सिमेंटची स्लीपर येत आहेत त्यापैकी काही स्लीपर येऊन प्रायोगिक तत्वावर दोन ठिकाणी बसविण्यात आले आहेत आणि ते यशस्वी झाल्याचे बोलले जाते.दरड ग्रस्त जागेवरील जुने रेल्वे रूळ काढून नवीन रूळ टाकण्यात आले.रुळाच्या खालील वाहून गेलेल्या जमिनीवर गॅबियन टाकण्यात येत आहेत.हा 21 किलोमीटरचा मार्ग सुस्थितीत आणण्याचे कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.या मार्गाच्या कामाची पाहणी करण्यासाठी ट्रॉलीचा देखील उपयोग करण्यात येत आहे.
नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, मुख्याधिकारी सुरेखा भणगे-शिंदे तसेच माजी नगराध्यक्ष अजय सावंत,मनोज खेडकर,विवेक चौधरी व माजी उपनगराध्यक्ष राजेश दळवी यांनी रेल्वे विश्राम गृहात त्यांची सदिच्छा भेट घेतली.
नपातर्फे विशेष कार्यक्रम
मिनिट्रेनला युनोस्कोचा दर्जा मिळाल्यानंतर 13 ,14 नोव्हेंबरला माथेरान नगरपरिषद आणि रेल्वेप्रशासन यांच्या संयुक्त आयोजनातून भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे आयोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यामधून पर्यटकांना येथील माथेरानचे पर्यावरण आणि संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा मानस आहे.या भेटी दरम्यान माथेरान नगरपरिषद रेल्वे प्रशासनाला सर्वोत्तपरी सहकार्य करण्यास तयार असल्याचे नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी सांगितले.