चालकांच्या मनमानीला बसणार चाप, प्रवाशांना होणार फायदा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
रेल्वे स्थानकातून प्रीपेड रिक्षा सुरु करण्याचा निर्णय काही महिन्यापूर्वी घेण्यात आला होता. प्रीपेड रिक्षासाठी लागणारा बूथ उभा करण्यासाठी स्थानक परिसरातील रेल्वेची जागा मिळवण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाणे रेल्वे प्रशासनाशी करार केला होता. मात्र या कराराची मुदत संपल्याने नव्याने करार करावा लागणार असून, यामुळे प्रीपेड रिक्षा सेवा सुरु होण्यास आणखी काही दिवसांची प्रतीक्षा पनवेलमधिल प्रवाशांना करावी लागणार आहे.
रिक्षा चालकांच्या मनमानीला चाप बसावा तसेच रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा चालकांकडून होणार्या गैर प्रकाराणा आळा बसावा या हेतूने पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून प्रीपेड रिक्षा सेवा सुरु करण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन विभागाने घेतला आहे. रिक्षा चालकांच्या काही संघटनानचा देखील या निर्णयला पाठिंबा आहे. आरटीओ च्या या निर्णयामुळे मनमाणी पद्धतीने भाडे आकारणे, प्रवशा सोबत अरेरावी करणे अशा प्रकाराणा आळा बसून रिक्षा प्रवाशांना याचा फायदा मिळणार असल्याने रेल्वे स्थानक परिसरातून लवकरात लवकर प्रीपेड रिक्षा सुरु होतील अशी अपेक्षा प्रवाशांना होती.
मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे हे शक्य होऊ न शकल्याने त्याच प्रमाणे प्रादेशिक परिवहन विभाग आनी रेल्वे प्रशासन यांच्यात बूथ उभरण्यासाठी लागणार्या जागे संदर्भात झालेला करार सपुष्टात आल्याने नव्याने करार होई पर्यत प्रीपेड रिक्षेसाठी प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार असल्याची माहिती पनवेल उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी निलेश धोटे यांनी दिली आहे.
प्रीपेड रिक्षा सेवेचे फायदे
प्रीपेड रिक्षा सेवा देण्यासाठी रेल्वे स्थानक परिसरात बूथ उभारण्यात येतो. या ठिकाणावरून प्रवाशांना प्रादेशिक परिवहन विभागाने आखून दिलेल्या दरानुसार इच्छुक स्थळी जाण्यासाठी पैसे भरून कुपन उपलब्ध करून दिला जातो. रिक्षा चालकाने प्रवाशाला इच्छित स्थळी सोडल्यावर संबंधित बूथ मधून रिक्षा चालकाला पैसे दिले जातात.