अरे बापरे! महिलांनी आमदारांची लाज काढली? म्हणाल्या…पहा व्हिडिओ

भरपूर निधी आहे, तुम्ही फक्त कामं सांगा, असे सांगून ग्रामस्थांची दिशाभूल करणार्‍या बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांना स्वतःच्या गावातील पाणी प्रश्‍न सोडविणे जमले नाही. त्यामुळे गेली कित्येक महिने हजारो अर्ज, तक्रारी देऊनही पाण्यासारखा गंभीर प्रश्‍न न सोडविणार्‍या निष्क्रिय बंडखोर आमदाराविरोधात थळ प्रभाग क्रमांक 4 मधील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गेली अडीच वर्षे पाण्यासाठी वणवण करणार्‍या महिलांनी अखेर सोमवारी (दि.10) कृषीवलसमोर आपली व्यथा मांडली. यावेळी आमदारांवरील महिलांचा राग अनावर झाला होता. जमलेल्या महिलांनी तर आमदारांना शिव्या दिल्या तरी पालथ्या घड्यावर पाणी, असे सांगत एकप्रकारे त्यांची लाजच काढली.

Exit mobile version