नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
वेलनेस फॉरएवर मेडिकेअर लिमिटेड ही 24 तास औषध सेवा पुरविणारी संस्था आता अलिबागमध्ये सेवेत दाखल झाली असून मंगळवारी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या सेवेमुळे अलिबागमध्ये प्रथमच 24 तास सेवा मिळू शकणार आहे.
महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यात विस्तारलेल्या वेलनेस फॉरएवर मेडिकेअर संस्थेच्या 285 शाखा आहेत. घरपोच औषध सेवादेखील उपलब्ध होणार आहे. शुभारंभानिमित्त वेगवेगळया सवलती जाहिर करण्यात आल्या आहेत. तसेच सवलतीच्या दरात औषध उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच ऑनलाईन सेवा देखील पुरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ग्राहकांच्या सेवेसाठी 7 औषधनिर्माता तसेच अनुभवी विक्रेते दाखल असल्याचे सांगण्यात आले. यावेळी टेरीटरी मॅनेजर प्रविण गुप्ता, एरिया मॅनेजर प्रकाश भांजा, शाखा मॅनेजर रोशन म्हात्रे, प्रसाद आचरेकर, आदी उपस्थित होते.