| अलिबाग | प्रतिनिधी |
आजही समाजात विधवा महिलेकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा आहे. मात्र, पुणे जिल्ह्यातील एका अविवाहित तरुणाने अनिष्ट प्रथा, परंपरांना बाजूला सारून रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील एका विधवा महिलेसोबत तिच्या मुलालाही स्वीकारून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
अलिबाग तालुक्यातील तुडाळ येथील ऋतिका यांच्या पतीचे आठ वर्षांपूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतर मुलाचे संगोपन व कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील प्रतिक भागवत या तरुणाचे त्याच्या आत्याकडे अलिबागमध्ये येणे-जाणे सुरु होते. त्याचवेळी त्याने ऋतिकाला लग्नाची मागणी घातली. ऋतिका विधवा असतानाही या तरुणाने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता, तिच्या मुलगासह तिला स्वीकारले.
अलिबागमधील रजिस्टर कार्यालयात सोमवारी त्यांचा लग्नसोहळा दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी ॲड. वाकडे यांनी सर्व न्यायालयीन प्रक्रिया पार पाडली.