। पाली/गोमाशी । वार्ताहर ।
अनु. आदि. आश्रमशाळा पडसरे येथे मंगळवारी (दि.23) वन्यजीव प्राण्यांचे संरक्षण आणि त्यांची सुटका याविषयी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
अलीकडे वन्यजीव प्राण्यांची संख्या खूपच कमी होत चालली आहे. यातच पशु-पक्षी, प्राण्यांचे जखमी होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी पुण्यातील रेस्न्यू चॅरिटेबल ट्रस्ट येथून श्रीनाथ चव्हाण, इजाज शेख आले होते. त्यांनी उत्तम असे मार्गदर्शन केले. प्राण्यांचे अपघात किंवा त्यांना दुखापत झाले की काय प्रथमोपचार करावे, कोणती काळजी घ्यावी, कोण कोणते साप विषारी असतात असे अनेक प्रकारे सखोल मार्गदर्शन केले. यावेळी ज्ञानप्रबोधिनी पुणे येथून आलेले ओंकार बानाईत, प्राणीमित्र शंतनू लिमये, मुख्याध्यापक संदिप शिंदे, मीनाक्षी ढोपे, शिक्षक वर्ग, अधीक्षक आणि कर्मचारी वर्ग तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या संपुर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश महाडीक यांनी केले.







