भरधाव कारने महिलेला उडवले

xr:d:DAFT9h13XAo:5,j:43219497372,t:22120606

| पनवेल | वार्ताहर |

कामोठे वसाहतीमधील सेक्टर 6 अ येथील सरोवर हॉटेलसमोर एका भरधाव कारने पादचारी महिलेला उडविल्याची घटना घडली आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या दोन वाहनांना देखील कारने मागून धडक दिली आहे. या घटनेमध्ये महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या अपघातानंतर रहिवासी जमा झाल्याने कारचालकाने आणखी वेगाने कार चालवत तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एमएनआर विद्यालयासमोर आणखी एका दुचाकीला त्याने धडक दिली. त्यानंतर रहिवाशांनी त्याला पकडून चोप दिला आणि कामोठे पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी महिलेला कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version