‘महिलांची मासिक पाळी शाप की वरदान’

विद्यार्थिनींसाठी आरोग्यविषयक जनजागृती कार्यक्रम
। अलिबाग । वार्ताहर ।
नॅचरल हेल्थ अँड एज्युकेशन फाउंडेशन ट्रस्ट आणि स्मार्ट चॉईस तसेच सचिन डाकी मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने, हाशिवरे येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, महिलांची मासिक पाळी शाप की वरदान? विषयाअंतर्गत किशोरवयीन विद्यार्थिनींसाठी शनिवारी (ता.12) आरोग्यविषयक जनजागृतीचा उपक्रम राबवण्यात आला.

या कार्यक्रमात रूढी, परंपरा याच्या नावाखाली चालत आलेले मासिक पाळी बद्दलचे समज-गैरसमज, अंधश्रद्धा दूर करून मासिक पाळीच्या दिवसात घ्यावयाची काळजी तसेच बाजारात उपलब्ध प्लास्टिक सॅनिटरी नॅपकिनमुळे महिलांना होणार्‍या विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी जैविक सॅनिटरी नॅपकिन ही काळाची गरज आहे. याविषयी माहिती देण्यात आली. संस्थेच्या वतीने दीपक खाडे यांनी मार्गदर्शन केले. तसेच किशोरवयीन मुलींच्या शंकांचे निरसन शैला खाडे यांनी केले. सदर कार्यक्रम सामाजिक कार्यकर्त्या श्रुष्टी डाकी यांच्या सहकार्याने करण्यात आला. महिलांच्या मासिक पाळीबाबत बर्‍याचदा महिला आणि मुलींमध्ये उदासीनता दिसून येते. परंतु या उपक्रमाला विद्यर्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी मुख्याध्यापक रामनाथ कडवे, शिक्षिका स्मिता म्हात्रे, अर्चना ठाकूर, वर्षा नाईक तसेच राजेंद्र कोळी, भाई पाटील हे या उपस्थित होते.

Exit mobile version