| आगरदांडा | प्रतिनिधी |
सशक्त नारी समृद्ध भारत व मुरुड एकात्मिक बालविकास विभागातर्फे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबिराचे आयोजन मुरुड दरबार हॉल येथे घेण्यात आले. या शिबिरात 217 महिलां सहभागी झाल्या होत्या. 44 महिलांनी आपली समस्या नोंदविली होती. त्याच्या समस्या बाबत निराकरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आशिका ठाकुर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रियदर्शनी मोरे यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी प्रियदर्शनी मोरे जिल्हा परिषद अलिबाग प्रकल्प संचालक, तहसीलदार रोहन शिंदे, गटविकास अधिकारी संगिता भांगरे, महिला बालकल्याण विस्तार अधिकारी संजय शेंडगे,प्रशासन अधिकारी संजय वानखेडे, पोलिस निरीक्षक प्रकाश सकपाळ, नायब तहसीलदार रविंद्र सानप, नायब तहसीलदार गोविंद कोटंबे, तालुका कृषी अधिकारी विश्वजीत अहिरे, पशुसंवर्धन अधिकारी सुदर्शन पाडावे, माजी उपसभापती प्रणिता पाटील, सुवर्णा चांदोरकर, शुभांगी कोतवाल, विश्वनाथ म्हात्रे, अंकिता घोडेकर, संतोष पुकळे, दत्तात्रेय सांतामकर, सुनील काळे, आशा सोंनकुसरे, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षण विभाग, तालुक्यातील पात्र लाभार्थी आदिंसह मान्यवर उपस्थित होते.