| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शेलू गावाची ग्रामदैवत असलेली आई भवानी मातेचा उत्सव 27 डिसेंबर पासून साजरा होत आहे. हा उत्सव आठ दिवस चालणार असून परिसरातील लोकांसाठी हा उत्सव मनोरंजनाचा ठरणार आहे.
शेलू गावाच्या पश्चिम दिशेला असलेल्या माळरानावर आई भवानी मातेचे लहानसे मंदिर आहे. गावाच्या चारही दिशेला अशी मंदिरे असून त्यापैकी कल्याण-कर्जत रस्त्याच्या पलीकडील भागात भवानी मातेचे मंदिर आहे. एका जांभळीच्या झाडाखाली आई भवानी माता विसावली असून ते झाड शतकाहून अधिक जुने आहे. गावातील प्रत्येक घरी काही शुभकार्य असेल तर गावातील ग्रामस्थ देवीचा मान देण्यासाठी तेथे आवर्जून जात असतात. कोणत्याही प्रकारची पशु हत्या त्या ठिकाणी केली जात नसून देवीची, ओटी भरणे, पूजा अर्चा करणे तसेच नित्य पूजा शेलू ग्रामस्थ यांच्याकडून केली जात असते. दुसरीकड़े त्या ठिकाणी नवरात्र उत्सव काळात अनेक देवीला माळ लावण्याची आणि नऊ दिवस कार्यक्रम करण्याची देखील प्रथा आहे. अनेक भक्तांना आई भवानी मातेच्या श्रेद्धेची प्रचिती आली आहे. भक्त देवीची मनोभावे पूजा करीत असतात.
गावातील तरुण कार्यकर्ते समीर मसने आणि हिसाळगे यांनी एकत्र येत आठ वर्षांपूर्वी देवीचा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. पौष दिवस यात्रा भरवली जात असते. यावर्षी 27 डिसेंबर ते 3 जानेवारी या कालावधीत देवीचा यात्रा आहे. आई भवानी जत्रा उत्सव साठी मंदिर आहे. त्या ठिकाणच्या पाच एकर हुन अधिक मोकळया जागेत पाळणे आणि झोपाळे, तसेच मनोरंजनचे अनेक खेळ यांची मांडणी करण्याचे काम सुरु आहे. या यात्रा उत्सव काळात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा तसेच सांस्कृतिक सपर्धा यांचे आयोजन करण्यात आले आहे. तर तरुण वर्गासाठी रक्तदान शिबीर देखील भरवले आहे.
देवीचा महाभांडारा 3 जानेवारी रोजी आयोजित केला जाणार असून त्या दिवशी सत्कार सोहळा आणि सांस्कृतिक तसेच भजनाचे कार्यक्रमाचे आयोजन आयोजक आई भवानी माता उत्सव मंडळाने केले आहे.