योगराज सिंग पुन्हा धोनीवर भडकले

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे अनेकदा महेंद्रसिंह धोनीवर टीका करतात. यावेळी टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याबद्दल बोलताना त्यांनी धोनीबद्दल भाष्य केले.

योगराज सिंग हे स्वतः माजी क्रिकेटर असून त्यांनी भारतीय संघातून क्रिकेट खेळलेले आहे. आयसीसी टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने धडक दिलेली आहे. योगराज सिंग यांनी याआधीही धोनीवर अनेकदा टीका केली आहे. नुकताच त्यांचा एक मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते विश्वचषक भारतच जिंकणार, असे सांगत आहेत. यावेळी धोनी संघात नाही, त्यामुळे आपण जिंकणारच असे ते मुलाखतकाराला सांगत आहेत. तसेच, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांनीही धोनीच्या विरोधात बोलल्याचा दावा ते करतात.

Exit mobile version