। पनवेल । प्रतिनिधी ।
पाण्याच्या टँकरने स्कूटीला धडक दिल्याने 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात टँकरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीर शेख (रा. तळोजा) हा स्कूटी (क्र. एमएच 46 सीझेड 0128) घेऊन घरी परत येत होता. दरम्यान पेंधर फाटा रेल्वे पटरीच्या पुढे तळोजा फैज 2 कडे जाणाऱ्या मार्गावर समोरून आलेल्या पाणी टँकर (क्र. एमएच 46 बीएम 2973) ने स्कूटीला जोरदार धडक दिली. या धडकेत अमीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल येथे नेले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.







