। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील पाषाणे या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या एका फार्म हाऊसमधील विहिरीत उडी घेत 72 वर्षीय महिलेने स्वतःला संपवून घेतले. त्या वृद्ध महिलेच्या मृत्यूचे कारण अद्याप पोलिसांना समजले नाही.विहिरीत उडी घेणार्या महिलेचे नाव शांताबाई सुदाम माटे असे आहे.
वांगणी-पाषाणे-कळंब रस्त्यावर पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत ग्रीन वूड हे फार्म हाऊस असून माटे कुटुंब तेथे राहते. पाषाणे येथील 72 वर्षीय शांताबाई सुदाम माटे यांनी मंगळवारी 29 जून रोजी गावालगत असणार्या विहिरीत रात्री 8 वाजण्याच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. या घटनेबाबत नेरळ पोलिसांना स्थानिक नागरिकांनी माहिती देताच, घटनास्थळी नेरळ पोलीस पोहचले. यावेळी नेरळ पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीतील महिलेला दोरीच्या साह्याने बाहेर काढले.
ही महिला पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ग्रीन वूड या सोसायटी येथील राहणारी असल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत असून ती रागीट स्वभावाची असल्याचे देखील बोलले जात आहे. मात्र या महिलेची हत्या की आत्महत्या या बाबत नेरळ पोलीस अधिक तपास करत आहेत.