। मुरुड-जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट जोरदार असुन दिवसाला 50 ते 60 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळत आहेत. त्याबरोबर मृत्यूची संख्या वाढत आहे, तरीही काही नागरिक बेजबाबदारपणे वागत असताना दिसत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीची साखळी तोडण्याची बाब गांभीर्याने घेताना दिसत नाही. सर्रास नागरिक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. लॉकडाऊनचे नियमाचे उल्लंघन करणार्यांवर पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी दंडात्मक कारवाई केली.
मुरूड पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे, पोलीस शिपाई परेश म्हात्रे, पोलीस हवालदार संतोष पाटील, पोलीस नाईक निलेश गिरी, महिला पोलीस अंकिता कार्लेकर आदींसह पोलीस पथक विनामास्क फिरणार्या 19 जणांकडून 3800 रूपये जमा केले तर वाहतूक नियम मोडणार्या 9 जणांकडून 1800 रूपये जमा करण्यात आले.
पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सर्व नागरिकांना व व्यापार्यांना आवाहन करण्यात आले की, कोरोनाच्या नियमाचे पालन करा नाही तर याच्यापेक्षा कडक कारवाई करण्यात येईल. तरी दुकानदारांनी आलेल्या ग्राहकांमध्ये अंतर ठेवा, दुकानासमोर सॉनिटायझर ठेवा, मास्क शिवाय ग्राहकांना सामान देऊ नका. तसेच या पुढे मास्क न वापरणार्यावर 500 रूपये तर रस्ता वर थुंकताना 500 रूपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.