जेएनपीटी | वार्ताहर |
नवघर आरोग्य उपकेंद्राची नव्याने इमारत उभारण्यासाठी 61.67 लाख रुपयांच्या खर्चाला तत्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उरणच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उभारण्यात आलेले नवघर आरोग्य उपकेंद्र मागील 20 वर्षीपासून बंदच आहे.हे केंद्र तातडीने उभारले जावे,अशी मागणी जि.प.सदस्य विजय भोईर यांनी केली होती. त्याची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी सुधाकर मोरे यांनी नवघर आरोग्य उपकेंद्राची दुमजली इमारत उभारण्यासाठी तातडीने बैठक घेऊन 61.67 लाख रुपयांच्या खर्चाला तत्काळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. नव्याने उभारण्यात येणार्या नवघर आरोग्य उपकेंद्रात रुग्णांसाठी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सेनेचे राजिप सदस्य विजय भोईर यांनी दिली.