प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत ओसंडून वाहणारी नदी केली पार
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या ओसंडून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान रायगड जिल्ह्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये नदीला आलेल्या पुराच्या पाण्यातून एसटी चालकाने गाडी नेली. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून एसटी चालकाने केलेल्या या धाडसामुळे जोरदार टीका होत आहे.
महाड तालुक्यातील रेवतळे फाटा येथील खाडीपट्टयात जाणाऱ्या रस्तावर नदीला आलेल्या पूराच्या पाण्यात एसटी नेण्याचा प्रकार समोर आला आहे. नदीच्या पुलावरुन पाणी ओसंडून वाहत असताना एसटी चालकाने प्रवाशांचा जीव धोक्यात टाकून भलतयं धाडस दाखवलं.