। चिपळूण । प्रतिनिधी ।
खेर्डी येथील विनोद भुरण मित्र मंडळाच्यावतीने खेर्डीमधील विलगीकरण कक्षातील रुग्णांना स्टीमर वाटप नुकतेच करण्यात आले. यावेळी सरपंच-उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.
या विलगीकरण कक्षामध्ये उणीव राहू नये, यासाठी विनोद भरण मित्रमंडळाने पुढाकार घेतला असून या मंडळाच्या वतीने नुकतेच विलगीकरण कक्षात नुकतेच स्टीमरचे वाटप करण्यात आले. तत्पूर्वी विनोद भुरण मित्र मंडळाने विविध उपक्रम राबवले आहेत. गतवर्षी कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन या मंडळातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले होते. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर वाटपाससह कोरोनाग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने देखील काही उपाय योजना राबवल्या. आतादेखील या मंडळाची समाजसेवा सुरूच असून यामुळे या मंडळाचे कौतुक करावे तितके कमी आहे.
तर काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या खेर्डी येथे विलगीकरण कक्षात विनोद भुरण मित्र मंडळातर्फे नुकतेच स्टीमरचे वाटप करण्यात आले. यावेळी खेर्डीच्या सरपंच वृंदा दाते, उपसरपंच विजय शिर्के, विनोद भुरण, अभिजीत खताते, बाळा दाते, संदेश मोहिते, अनिल फाळके, शैलेश दाते, शैलेश भुरण, विवेक दाते, राकेश भुरण, संकेत चिले ग्रामपंचायत कर्मचारी योगेश शिगवण आदी उपस्थित होते.