| पनवेल | वार्ताहर |
एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कम व सोन्याची नाणी चोरून नेल्याची घटना नवनाथ नगर येथील झोपडपट्टी परिसरात घडली आहे. सदर ठिकाणी एक सामाजिक संस्थेचे कार्यालय आहे. या कार्यालयात महिलांना विविध उद्योगधंद्यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येते. सदर कार्यालयात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून कार्यालयात असलेले महत्वाची कागदपत्रे, रोखरक्कम व 25 हजारांची सोन्याची नाणी असा ऐवज चोरून नेला आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.