नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जुलै 2021 पासून केंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार असल्याचं एक पत्र व्हायरल झालं आहे. या पत्रावर आता केंद्रीय अर्थ मंत्रालयानेच ट्विट करून स्पष्टीकरण दिले.कोरोनाचं संकट ओढवल्याने केंद्र सरकारने अनेक खर्चांना कात्री लावत केंद्रीय कर्मचार्यांना देण्यात येणार्या महागाई भत्त्यांच्या वाढीला स्थगिती दिली होती. नंतर ही वाढ दिली जाईल असंही अर्थ मंत्रालयाने स्पष्ट केलं होतं. मात्र, अद्यापही याबद्दल केंद्र सरकार वा अर्थ मंत्रालयाने काही भाष्य केलेलं नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय अर्थ मंत्रालयाचं एक पत्र सोशल मीडियावर फिरत आहे. ज्यात जुलै 2021 पासून केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ करणार असून, पेन्शन धारकांनाही वाढत्या महागाईच्या काळात दिलासा दिला जाणार असल्याचा उल्लेख आहे. व्हायरल झालेल्या या पत्रावर आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने खुलासा केला आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डलवर शनिवारी एक ट्विट करण्यात आलं आहे. ज्यात महागाई भत्ता वाढ आणि पेन्शनधारकांना दिलासा देण्यासंदर्भातील पत्रही पोस्ट करण्यात आलं आहे. या पत्रावर स्पष्टीकरण देताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटलं आहे की, ङ्गकेंद्रीय कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याबद्दल आणि पेन्शन धारकांना महागाईच्या काळात दिलासा देण्यासंदर्भात कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही.