कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची भीती
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
करोना संकटात कुंभमेळा पार पडल्याने टीका झाल्यानंतर अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उत्तराखंड आरोग्य विभागाने हरिद्धारमध्ये कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचा संशय व्यक्त केला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण 1 लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एनज्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
एका प्रकरणात तर एकाच फोन क्रमांकावरुन 50 जणांचं रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं असून एकच अँटिजन टेस्ट किट 700 चाचण्यांसाठी वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पत्ते आणि नावं काल्पनिक आहेत. हरिद्वारमधील ङ्गघर क्रमांक 5फ मधून 530 नमुने घेण्यात आले आहेत. एकाच घऱात 500 लोक राहत असणं शक्य तरी आहे का? काहीजणांनी तर मनाप्रमाणे पत्ते टाकले आहेत. घर क्रमांक 56, अलिगड; घर क्रमांक 76, मुंबई असे पत्ते लिहिले आहेत, अशी माहिती तपासात सहभागी एका अधिकार्याने दिली आहे.
कुंभमेळ्यातील आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्जून सिंह सेनगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीने दोन खासगी प्रयोगशाळांमधील नमुने जमा करणं अपेक्षित होतं. त्याचीही चौकशी सुरु आहे. हरिद्वारचे जिल्हा दंडाधिकारी सी रवीशंकर यांनी या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जात असून पुढील नोटीस येईपर्यंत सर्व एजन्सींचं देय थांबण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.
हरिद्वारच्या जिल्हा दंडाधिकार्यांना सविस्तर तपास अहवाल पाठवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी अनियमितता आढळली असून जिल्हा दंडाधिकार्यांनी 15 दिवसांनी सविस्तर अहवाल पाठवल्यानंतर आम्ही कारवाई करु.
अमित नेगी, आरोग्य सचिव
चाचणी घेणारे राजस्थानचे
धक्कादायक म्हणजे एजन्सीकडून नमुने गोळा करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेले 200 जण राजस्थानमधील विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर असल्याचं समोर आलं आहे जे कधीही हरिद्वारमध्ये आले नव्हते. नमुने गोळा करणारी व्यक्ती तिथे स्वत: उपस्थित असणं गरजेचं आहे. एजन्सीकडे नोंदणी असणार्यांशी संपर्क साधला असता त्यातील 50 टक्के राजस्थानचे रहिवासी असून विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर आहेत, अशी माहिती अधिकार्याने दिली आहे.