। पनवेल । वार्ताहर ।
जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था, शेतकरी कामगार पक्ष आणि दिपक क्लिनिकल लॅबोरेटरी यांच्या माध्यमातून सर्व माता भगिनी यांच्या आरोग्याच्या दृष्टीने पुढील नऊ दिवस मोफत थायरॉइड चेकअप शिबिराचे शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी आपल्या सर्वांसाठी स्वच्छता दूत म्हणून सेवा देणार्या आपल्या भगिनींची थायरॉईड तपासणी करून ममता म्हात्रे यांच्या उपस्थितीत शिबिराची सुरुवात झाली. याप्रसंगी नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, राजश्री शेळके, हेमलता कुदळे मान्यवर उपस्थित होत्या. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केले आहे.