। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी ही माहिती दिली. तसेच कोरोना परिस्थिती लक्षात घेता राज्यात 22 जूनपर्यंत कर्फ्यू ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मंगळवारी (15 जून) सकाळी 6 वाजता कर्फ्यूचा कालावधी संपेल, असे उनियाल यांनी सांगितले. उनियाल म्हणाले की, या कालावधीत जुन्या प्रमाणित कार्यप्रणाली (एसओपी) काही बदलांसह कायम राहतील. ज्या जिल्ह्यात चारधाम आहेत. त्या जिल्ह्यातील रहिवाशांना निगेटिव्ह आरटीपीसीआर कोविड चाचणी अहवालासह मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.