। अलिबाग । प्रतिनिधी ।
5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यातील 10 महापालिकांना आणखी एक अतिरिक्त आयुक्त मिळणार आहे. यामुळे त्या महानगरपालिकांमध्ये आयुक्तांची संख्या दोन होणार आहे. यामध्ये मीराभाईंदर, पनवेल, भिवंडी, उल्हासनगर, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, सांगली, अकोलाचा समावेश आहे.