I पेण I प्रतिनिधी I
कोरोना विषाणूच्या महामारीमुळे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या फेऱ्या कमी केल्या होत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना प्रवास करताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. रायगड जिल्हा कोरोनाच्या चौथ्या टप्प्यातून तिसऱ्या टप्प्यात आल्यामुळे पेण एसटी आगाराने एसटीच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पेण एसटी आगारातून पुढीलप्रमाणे नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.
पेण – नालासोपारा सकाळी ८-०० वाजता, नालासोपारा – पेण १२-४५ वाजता, पाली – नागोठणा, पेण – सायन मार्गे बोरिवली १७-०० वाजता, बोरिवली- सायन, पनवेल – खोपोली परळी मार्गे पाली ७-०० वाजता, पेण-अहमदनगर ६-०० वाजता, अहमदनगर-पेण १४-०० वाजता सुरू करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त पेण-पनवेल, पेण- खोपोली, पेण -अलिबाग या गाड्या यापूर्वीच सुुरू करण्यात आल्या आहेत अशी माहिती पेण एसटी आगाराच्या प्रभारी व्यवस्थापक अपर्णा वर्तक यांनी दिली. पेण तालुक्यातून दररोज हजारो प्रवासी एसटीने प्रवास करीत असतात एसटीच्या फेऱ्या वाढल्यामुळे या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे