। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सत्तेवर आली आहे. या सत्तेमुळे राज्यात शिवसेनेचे प्राबल्य वाढले आहे. आता दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
शिवसेनेच्या 55 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधला. अनेकांच्या पोटात दुखतंय. पण शिवसेना त्यांना औषध देतंय. अनेक जण स्वबळाचा नारा देत आहेत आपण पण स्वबळाचा नारा देऊ. न्याय मागण्यासाठी सुद्धा स्वबळ लागतं. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही, असे ते म्हणाले. तलवार उचलण्याची हिम्मत नाही. असेही त्यांनी विरोधकांना सुचित केले.