रायगडसह सहा जिल्ह्यात निर्बंधच
मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु असून,ज्या जिल्ह्यातील कोरोना रुग्ण,आयसीयु बेडची स्थिती आणि मृत्यू दर यावर निर्बंध शिथिल केले जात आहे.त्यानुसार येत्या सोमवारी राज्यातील आणखी काही जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे.त्यात मुंबईचा देखील समावेश आहे. कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांमध्ये नियमांची अंमलबजावणी सक्तीने सुरु ठेवली जाणार आहे.
निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्ह्यांचं पाच गटात वर्गीकरण केलं जात असून, प्रत्येक आठवड्याला निकषानुसार यादी जाहीर केली जात आहे. पुढील आठवड्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य सरकारने निर्बंध हटवण्यासंदर्भात पाच गट तयार केलेले आहेत. पॉझिटिव्हीटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची संख्या यानुसार या जिल्ह्यांचं वर्गीकरण केलं जातं. सरकारने काढलेल्या आदेशाप्रमाणे सर्वात कमी पॉझिटिव्हीटी रेट म्हणजेच 5 टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट असणार्या जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे हटवण्यास परवानगी आहे. तर सर्वात जास्त पॉझिटिव्हीटी रेट असणार्या जिल्ह्यातील निर्बंध वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत.
निर्बंध हटवण्यासंदर्भातील पंचस्तरीय कार्यपद्धती लागू करून दोन आठवडे झाले आहेत. पुढील आठवड्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भातील माहिती राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. यात राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत पाच टक्क्यांच्या वर पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या पण आता पाच टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट आलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
पहिल्या गटातील जिल्हे
अहमदनगर (3.06), अकोला (4.97), अमरावती (1.97), औरंगाबाद (2.94), भंडारा (0.96), बुलडाणा (2.98), चंद्रपूर (0.62), धुळे (2.42), गडचिरोली (3.53), गोंदिया (0.27), हिंगोली (1.93), जळगाव (0.95), जालना (1.51), लातूर (2.55), मुंबई (3.79), नागपूर (1.25), नांदेड (1.94), नंदूरबार (3.13), नाशिक (4.39), परभणी (0.94), सोलापूर (3.73), ठाणे (4.69), वर्धा (1.12), वाशिम (2.79), यवतमाळ (3.79).
पहिल्या गटात नसणारे जिल्हे
बीड (7.11), कोल्हापूर (13.77), उस्मानाबाद (5.21), पालघर (5.18), पुणे (9.88), रायगड (12.77), रत्नागिरी (11.90), सांगली (8.10), सातारा (8.91), सिंधुदुर्ग (9.06), यवतमाळ (5.24)