। पनवेल । प्रतिनिधी ।
पैशांवरून बायकोसोबत वारंवार होणार्या भांडणाचा राग पित्याने मुलांवर काढल्याची संतापजनक घटना मानखुर्द येथे घडली. भांडणानंतर पत्नी बहिणीकडे निघून गेल्यावर माथेफिरू बापाने आईस्क्रिमधून मुलांना उंदीर मारण्याचे औषधे खाऊ घातले. त्रास होऊ लागताच तिघा मुलांना शीव रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. मात्र, मंगळवारी एका सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. या प्रकरणातील कू्रकर्मा बाप फरार झाला आहे.
72 वर्षीय महिलेची विहिरीत उडी घेत आत्महत्या
मानखुर्दच्या अण्णाभाऊ साठे नगरातील शिवशंकर चाळीत आरोपी मोहमद्द अली नौशाद अन्सारी (27) हा त्याची पत्नी नाझिया अन्सारी (25) आणि तीन मुले अलिना (7), आलिशान (6), आणि अरमान (अडीच) यांच्या सोबत राहतो, वेठबिगारीचे काम करणार्या अलीचे 21 ते 25 जून दरम्यान पैशांवरून नाझियासोबत सतत भांडण होत होते. त्यामुळे वैतागून 25 तारखेला सायंकाळी बैंगनवाडी येथे राहणार्या बहिणीकडे निघून गेली होती. त्यानंतर तासाभराने अलीने बायकोला फोन करून मुलांना आईस्क्रिममधून उंदीर मारण्याचे औषध खाऊ घातल्याचे सांगितले. त्यानंतर थोड्या वेळाने मुलांना त्रास होऊ लागल्याने आरोपी बापानेच तिन्ही मुलांना शीव रूग्णालयात नेले.
…तर पतीला माफ केलं असतं
मुलांना शीव रूग्णालयात दाखल केल्यानंतर मानखुर्द पोलीस ठाण्यात सिक संदेश प्राप्त झाला होता. या सिक संदेशाच्या चौकशीदरम्यान नाझियाने खरी हकीकत सांगायचे टाळले होते. पतीने केलेल्या कृत्याची पोलीसांना माहिती दिली आणि पोलीस त्याला घेऊन गेले तर आपला आणि मुलांचा सांभाळ कोण करणार, या विचारातून तसेच तेव्हा मुलांची तब्येत ठिक असल्याने नाझियाने खरे सांगायचे टाळले होते. मुलांना काहीच झाले नसते आणि सुखरूप घरी परतले असते तर पतीला माफ करणार होती, पण मंगळवारी मुलाचा मृत्यू झाल्यानंतर नाझियाने पोलिसात पतीविरोधात तक्रार दिली आणि गुन्ह्याची सविस्तर माहिती दिल्याचे मानखुर्द पोलिसांनी सांगितले.