पशुसंवर्धन आयुक्तांची ही भुमिका पुर्वग्रहदुषित असल्याचा आरोप
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या मागण्या संदर्भने आयेजित बैठकीत 11पैकी 2 मागण्यावर चर्चा करण्यात आली. पशुसंवर्धन आयुक्तांची ही भुमिका पुर्वग्रहदुषित असाल्याचा आरोप करत संघटनेने मंगळवार(ता. 15) पासुन विविध टप्प्यावर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत संघटनेच्या वतीने काढण्यात आलेलया प्रसिद्धी पत्रकानुसार पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या वतीने 11 मागण्यांचे निवेदन पशुसंवर्धन आयुक्तांना देण्यात आले होते. त्यावर चर्चा करण्या करीता पशुसंवर्धन आयुक्तांकडून निमंत्रण अपेक्षित होते. परंतु आयुक्तांकडून या निवदेनाची कोणत्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संघटनेच्या पदाधिकार्यांनी सोमवार (दि. 7 जून रोजी) पशुसंवर्धन आयुक्तांची त्यांच्या दालनात भेट घेतली होती. यावेळी देखील 11 पैकी 2 मागण्यांवर अर्धवट चर्चा करून बैठक संपविण्यात आली.
संबंधित कार्यालयाची ही भूमिका पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेच्या विरोधी आणि पुर्वग्रहदुषित असल्याचा आरोप संघटनेने या पार्श्वभूमीवर केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आंदोलनाच्या माध्यमातून पशुपालकांना वेठीस न धरता चर्चेतुन या समस्यांचे निराकरण व्हावे अशी अपेक्षा संघटनेला होती. परंतु प्रशासनाने मागण्यांची कोणतीच दखल न घेतल्याने अतिरिक्त संघटनेने मंगळवार (ता.15) पासून विविध टप्प्यात आंदोलनाचा इशारा दिला आहे. मंगळवार (ता.15) पासुन लसीकरण, सर्व प्रकारचे ऑनलाईन, नासिक, तसेच वार्षिक अहवाल देणे बंद, त्या सोबतच आढावा बैठकांना देखील संवर्गातील सदस्य उपस्थित राहणार नाहीत.
शुक्रवार (ता.25) पासून राज्यातील विधानसभा, विधान परिषद सदस्य यांना निवदेन देत मागण्याकडे लक्ष वेधण्यात येणार आहे. त्यानंतर तिस-या टप्प्यात 16 जुलै पासून कायदयाप्रमाणे काम केले जाईल. त्यासेबतच सर्व शासकीय व्हॉटसअप ग्रुपमधुन बाहेर पडण्याचा निर्णय देखील संवर्गातील सदस्यांनी घेतला आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. सुनिल काटकर यांनी या संदर्भात निवेदन आयुक्तांना दिले आहेत. तसेच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष डॉ. कैलास चौलकर यांनी या सदंर्भात निवदेन रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष योगिता पारधी, अलिबाग, कृषी व पशूसंवर्धन सभापती बबन मनवे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, यांना दिले आहेत.